¡Sorpréndeme!

हमारे हालात बदतर ही रहेंगे :प्रशासनाविरुद्ध मुस्लिम मदारी समाजाची खदखद | Maharashtra | Sakal |

2021-04-28 503 Dailymotion

प्रमोद काळबांडे ः सकाळ वृत्तसेवा
मदारी वस्ती (बडनेरा). ता. 25 ः पचास साल पह्यलेभी हम झोपडीयो में रहते थे. जमाना बदल गया. लेकिन हमारे हालात नही बदले. कलेक्टर, कमिश्नर, आमदार, खासदार सबको निवेदन दिए. किसीको हमारा कुछ लेना देना नही है. कल सभी लोग 26 जनवरीका जश्न मनाएंगे. लेकिन हमारे हालात बतदर ही रहेंगे. सैयद इकबाल मदारी त्यांच्या शब्दाशब्दातून जगण्याचे वास्तव मांडत होते.
अमरावतीनजीकच्या बडनेरा येथील रजानगर परिसरातील मुस्लिम मदारी वस्तीवर सकाळ प्रतिनिधीने भेट दिली. त्यावेळी हादरून जावे असे चित्र दिसले. तब्बल 175 कुटुंबे इथे राहतात. म्हणजेच एक हजार लोकांची वस्ती. कुणाचे घर तट्ट्याचे, कुणाचे टिनाचे, कुणाचे ताडपत्रीचे तर कुणाचे केवळ चार खांबावर टांगलेल्या चद्दरचे. या वस्तीकडे जाताना रस्त्यात लागणारे बडनेरा येथील देखणे रेस्ट हाऊस या वस्तीला जणू वाकुल्या दाखवत उभे होते. अत्यंत दारिद्री वस्तीत शिरताना अंगावर काटा येतो. नवागतांचे स्वागत करणारा एक रंगीत अक्षरातील बोर्ड दिसतो. त्यावर मुस्लिम मदारी समाज विकास संस्था लिहिले असून त्याखाली उद् घाटक मा. आमदार रविभाऊ राणा असे ठळक आकारात जरा वेगळ्या रंगात पेंटिग केलेले दिसले. संस्थेचे सचिव सय्यद पप्पू मदारी यांनी त्यांच्या मनातील खदखद मांडली. हमारे परिवार थंडी, धुप और बारिशमें परेशानी झेलते है. तुटे-फुटे झोपडोमें हम कब तक जिएंगे? क्या तरक्की करेंगे हमारे बच्चे ? दगड भिरकावा तसा व्यवस्थेला त्यांनी सवाल केला.
मदारी समाजाचा खेळ करण्याचा पारंपरिक व्यवसाय केव्हाच बंद झाला. मजुरीसाठी वणवण फिरणे आणि चार घास पोटात टाकण्याची व्यवस्था करणे, यातच जिंदगी चालली आहे. भटके-विमुक्त जाती-जमातीत समावेश असलेल्या या वस्तीवर कधीतरी गणराज्य येईल यासाठी ही माणसे मोठ्या आतुरतेने आस लावून बसली आहेत.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.